शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. 18) दिले आहेत. यामध्ये वाकड, चिंचवड आणि वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त बदलले आहेत. तर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक आयुक्त सतीश माने 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा अतिरिक्त कार्यभार वाकडचे सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आला. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये डॉ. विशाल हिरे यांची वाकड विभागातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांची अभियान येथून बदली झाली असून त्यांना चिंचवड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चिंचवड विभागाचे सहायक आयुक्त राजू मोरे यांची वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. ठाणे शहर येथून 5 जुलै 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे हजर झालेले सहायक आयुक्त सुनील कुराडे यांना वाकड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.




