पिंपरी :- पवना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे पवना धरण जलाशय आज (दि. २५) रोजी दुपारपर्यंत ७५ टक्के क्षमतेने भरले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार पवना धरणातून कधीही धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
पवना नदी काठच्या नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीमधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.



