![]()
मुंबई : स्पामध्ये पोलीस आरटीआय कार्यकर्त्याची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना वरळी इथल्या सॉफ्ट टच स्पामध्ये बुधवारी रात्री घडली. गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे असं हत्या करण्यात आलेल्या खबऱ्याचं नाव आहे. सॉफ्ट टच स्पामध्ये हत्या प्रकरणी पोलिसांनी स्पा मालक संतोष शेरेकर याला अटक केल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली आहे. वरळी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी ही या प्रकरणी 26 वर्षीय आरोपीला ठाण्यातून अटक केल्याची माहिती दिली आहे.
स्पा मालकानंच रचला कट, मारेकऱ्याला नालासोपाऱ्यातून अटक
वरळी येथील सॉफ्ट टच स्पामध्ये झालेल्या हत्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा इथून 26 वर्षीय मोहम्मद फिरोज अन्सारी या आरोपीला अटक केली. साकिब अन्सारी आणि इतर दोन आरोपींना कोटा इथून गुन्हे शाखेनं अटक केल्याची अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे. स्पाचा मालक शेरेकर यानं हा हत्येचा कट रचला असल्यानं त्याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.


