
पिंपरी : शहरात गेल्या काही दिवसांपासून विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची जीवनवाहिनी पवना नदी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे.
दरम्यान पुराचा धोका ओळखून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपात्कालीन टीमने चिंचवडगावातून डांगे चौकाकडे जाणारा बिर्ला हॉस्पिटल समोरील पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
याशिवाय चिंचवडगाव ते काळेवाडी पूल, पिंपरीगाव ते काळेवाडी पूल, चिंचवडगावातील मोरया मंदिरा शेजारील धनेश्वर पूलदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आल आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच महत्त्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




