
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नाव आता बदलण्यात आले आहे. या दोन्ही हॉलचे नाव अनुक्रमे ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्यांना राष्टपती भवनाशी जोडून घेण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनातील सर्व महत्वाचे कार्यक्रम दरबार हॉल येथेच घेतले जातात. राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळाही येथेच संपन्न होत असतो. त्यामुळे हा हॉल राष्ट्रपती भवानाचा अभिन्न भाग असल्याचे म्हटले जाते. दरबार हॉलसोबतच अशोक हॉल येथेही अनेक औपचारिक सोहळ्यांचे आयोजन केले जात असते. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की भारतीय शासक, इंग्रज यांची न्यायालये आणि विधानसभा या अर्थात दरबार हा शब्द होता.
भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यानंतर तो शब्द अप्रासंगिक ठरतो. त्यामुळेच त्याचे नाव बदलून गणतंत्र भवन असे करण्यात आले आहे. गणतंत्र अर्थात लोकशाहीची भावना भारतात प्राचीन काळापासून चांगली रूजली असल्यामुळे गणतंत्र मंडप हे नाव त्यासाठी आयोग्य सुयोग्य ठरते. अशोक हॉलचे अशोक मंडप करण्याच्या संदर्भात सांगण्यात आले की हे नाव भाषेमध्ये एकरूपता आणते. तसेच ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्य मिळाल्याचे ते प्रतिक आहे. अशोक शब्दाचा अर्थ आहे सर्व दु:खापासून स्वतंत्र झालेली व्यक्ती.




