
भोसरी: भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील अर्धवट अर्बन स्ट्रीटचा लोखंडी गज छातीमध्ये घुसल्याने एकाचा मृत्यू झाला.
दीपक बवले (वय 54) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गव्हाणे वस्ती परिसरात राहणारे बवले हे शुक्रवारी रात्री आठ वाजता या अर्बन स्ट्रीट समोरील रस्त्याने जात होते. त्यांची गाडी मारुती शोरूम समोर स्लिप झाली. ते थेट या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले. हा लोखंडी गज बवले यांच्या छातीमध्ये आरपार घुसला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या पूर्वीही या लोखंडी गजांमुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता हा अर्बन स्ट्रीट नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचा आरोप होत आहे.




