चिंचवड : मोहननगर परिसरामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सातत्याने होणारा वीजपुरवठा कायम स्वरूपात सुरळीत करण्याची मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केली.
याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहननगर परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून दररोज 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरवा करून तो सुरळीत करण्याची विनंती करत आहोत. आपल्या विभागाचे कर्मचारी येऊन तो सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात पण पुन्हा दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे गृहिणी, शाळकरी मुले,तसेच कामाला जाणाऱ्या नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
सकाळचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. खंडित विजपुरवठा सुरळीत होण्यावरती आपण लक्ष घालून कायम स्वरूपी तोडगा काढून, वीज पुरवठा कसा सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना (Chinchwad) करण्यात यावे. याबाबत यापूर्वीही निवेदन देण्यात आले आहे.इथून पुढे यावरती कारवाई न झाल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू किंवा महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.




