
पुणे : ejanashakti | ढोलताशांचा गजर, मधुर सुर, पारंपरिक पोषाखात नटलेली तरुणाई तसेच चहूबाजूंनी घुमणारा बाप्पाचा आवाज, या जयघोषात लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत तयारी सुरु झालेली आहे.
दरम्यान विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. याबाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
या बैठकीला शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी होते. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीण पाटीलआणि मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या.




