
पिंपरी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्भवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर भाजपचे माजी नगरसेवक व भोसरी विधानसभेतील प्रमुख दावेदार रवी लांडगे यांनी शिवसेना पक्षात शिवबंधन बांधुन प्रवेश केला. त्यांच्यासोबत बहुसंख्येने शिवसैनिक तसेच मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भोसरी मधे शिवसेनेचाच आमदार होणार अशा शुभेच्छा दिल्या. उद्भवजी ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिक कै. बाजीराव लांडे पाटील यांची आठवणींना उजाळा दिला. तसेच आपले घर एकच आहे आणि भोसरीमध्ये यावेळेस भगवा नक्की फडकणार अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिनभाऊ अहिर, हर्षल प्रधान, मिलिंदजी नार्वेकर यांच्यासह सुलभाताई उबाळे, धनंजय भाऊ अल्हाट, एकनाथ पवार, संजोग वाघेरे पाटील, संतोषभाऊ वाळके, सचिन सानप, दादा नरळे, नितीन बोंडे, कुणाल तापकीर, राहुल गवळी, आबा नाईक, दिलीप मामा सावंत, अशोकराव वाळके, महादेव अण्णा गव्हाणे, सम्राट दादा फुगे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
