कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं. तर, महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही शाळेसंदर्भात कडक नियमावली जारी केली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत सर्वच सरकार गंभीर बनल्याचं दिसून येतं. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गेल्याच आठवड्यात आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं होतं.
आता, पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचारसंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आलं आहे. या नव्या कायद्यानुसार 36 दिवसांत बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे. तर, पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास 10 दिवसांता दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येतं.