पिंपरी : चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का असल्याचे मत चिंचवड मधील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. चिंचवड विधानसभेतून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगत आपली राजकीय भूमिका भोईर यांनी स्पष्ट केली.
https://www.facebook.com/share/v/nEBkjXsCcBKB4uX2/?mibextid=qi2Omg
भोईर पुढे म्हणाले की, येत्या 2 ऑक्टोबरला मतदारसंघात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. आपण आजपर्यंत एक लाख लोकांच्या थेट संपर्कात आहे. या सर्व नागरिकांच्या भावना व आशीर्वाद घेऊन मी येत्या 2 ऑक्टोबरला मतदारसंघात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळाव्यात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे असे त्यांनी म्हटले.
गेल्या अनेक वर्ष मी नगरसेवक म्हणून शहराच्या प्रतिनिधित्व केले उद्योग नगरीची सांस्कृतिक नगरी ओळख करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. विधानसभेमध्ये असलेल्या घराणेशाही आणि दडपशाहीमुळे मतदार संघात विकासाचे विकेंद्रीकरण होऊ शकले नाही. केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नसली तरीही जनतेला सर्व वस्तुस्थिती माहित आहे त्यामुळे मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे निश्चित केले आहे. मतदारसंघात संख्या वाढली, मात्र समस्या जैसे तेच आहे. 24 तास पाण्याचा प्रश्न, वाढती वाहतुक कोंडी, घनकचरा व्यवस्थापन याचबरोबर राजकीय लोकांनी महापालिकेत चालवलेले ठेकेदारी आणि टीडीआरच्या अनेक आर्थिक मायाजाळ गोळा केलेली आहे. यामुळे स्व:स्वार्थासाठी त्यांनी अनेक वर्षे राजकारण केले. हेच प्रश्न येऊन मतदारांच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार भोईर यांनी ठरवला आहे. मोरया गोसावी याची भक्ती हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझे ध्येय असल्याचे भोईर यांनी यावेळी सांगितले.