कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे पिंपरी चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरण या ठिकाणी असलेल्या ग.दि. माडगूळकर सभागृहात स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी १८३ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. ६५ टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधासभा निवडणुकीत १८३ जागा जिंकू शकतो, महायुतीचा विचार केला तर ते तीन अंकी संख्याही गाठतील की नाही अशी स्थिती आहे.” असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं.