इंदापूर : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतचे नाराज रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार हे निश्चित आहे. सोमवारी (ता. 7 ऑक्टोबर) इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारानी रामराजे नाईक निंबाळकर यांचे मत न घेता फलटणमध्येच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असल्याचे सांगून तारीखही जाहीर केली.
इंदापुरात शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार म्हणाले, “चित्र बदलत आहे. आज इथे कार्यक्रम आहे. फोन करायचा दुसरा मार्ग नाही. त्यांनी फोन लावला. इंदापुरला फोन केला, 14 तारखेला बातमी हवी आहे. काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले. ,इंदापुरला आहे, आम्ही इकडे कुठे आहोत?” शरद पवार म्हणाले, ”समाजलं काय?
पुढे बोलताना पवार म्हणाले, “आता याच्यानंतर फलटण. फलटण झाल्यानंतर जवळपास सगळ्या महिन्याचे दिवस बुक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात निर्णय आहे की, एकत्र आलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजं. महाराष्ट्रातील चित्र वेगळं आहे, संपूर्ण हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे. ती दाखवण्याची संधी आज महाराष्ट्रात आलेली आहे”, असे शरद पवारांनी उपस्थितांना सांगितलं.



