पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. हा सर्व प्रकार खराळवाडी मधील हॉटेल राज प्लाजा या लॉजवर घडला. या घटनेनंतर गंभीर जखमी असलेला तरुणीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काही तासांतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. नितेश नरेश मिनेकर आणि करिष्मा ईश्वर घुमाने असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगालाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हॉटेल अँड लॉज राज प्लाझा येथे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रूम बुक केली होती. अवघ्या काही मिनिटातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने ११२ नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतलं. पोलीस हॉटेलमध्ये आले, त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतून नितेशने कपडे घालत आहे. दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. परंतु, त्यानंतर बराच वेळ झालं दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, करिष्मा रक्ताच्या थारोळ्यात तर नितेशने गळफास घेतल्याचं उजेडात आलं.




