
पुणे : पुणे पोलिसांनी पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाईवरुन तब्बल ५ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला होता. नाशिक जिल्ह्यातील कारखान्यावरही कारवाई केली होती. ही कारवाई करणार्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे व त्यांच्या पथकाला राज्य शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़. तशी अधिसुचना शासनाने जारी केली आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने ड्रग्सची पाळेमुळे खणून काढताना अगदी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता. या पथकाला शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईबाबत कामगिरची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.




