पिंपरी चिंचवड : शहरातील दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक चौकात सिग्नल व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पुनावळे व पिंपळे निलख येथील औंध रावेत बीआरटी रस्त्यावरती असणारे सिग्नल ग्रीनवरेड एकाच वेळी लागत असल्याने नागरिकांना लक्षात येत नाही. कॅमेरात बसून दंड मारणाऱ्या यंत्रणांनी या घटनेची नोंद घ्यावी आणि महापालिकेने सिग्नल व्यवस्था तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील दळणवळण सुरळीत होण्यासाठी शहरातील प्रत्येक सिग्नल वरती ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यामध्ये सिग्नल तोडल्यानंतर अनेक वाहनावर कारवाई होताना दिसत आहे परंतु जर सिग्नल व्यवस्था खराब असेल आणि सिग्नल पाळला की तोडला हेच चालकांना कळत नसेल तर अशावेळी दोष कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावरती दररोज हजारो वाहने ये जा करत असतात अशावेळी जर सिग्नल व्यवस्था खराब असेल एकाच वेळी ग्रीन व रेड लाईट लागत असतील तर वाहन चालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो अशावेळी वाहनावर ऑनलाईन बुर्दंड पडला तर याला दो शिकून असा संवाद सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
यासाठी तुकाराम महाराज यांच्या कृतीप्रमाणे “लोका सांगे ब्रह्ज्ञान…” म्हणजेच सिग्नल पाळावे, सिग्नल तोडू नये असे जेव्हा प्रशासन अपेक्षा करते. अशावेळी सिग्नल व्यवस्था सुरळीत ठेवणे हेही त्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीला हात झटकून चालणार नाही त्यावेळी शहरातील वाहनावर कारवाई करण्यापूर्वी सर्व सिग्नल व्यवस्था व जाहिराती स्पष्ट दिसतील व नागरिकांना संभ्रम होणार नाही अशा स्थितीत ठेवणे महापालिका प्रशासनाचे जबाबदारी आहे यासाठी त्यांनी यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त पुढाकाराने द्यावा अशी आशा आहे.




