मुंबई : अनेक वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय पेंडींग होता. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची लिस्ट तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे गेले होते मात्र त्यांनी ती रद्द केली त्यानंतर पाच वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित होता. राज्यात अडीच वर्षानंतर राजकीय सत्या नाट्य झाले. आगामी विधानसभा निवडणुकीचे आचारसहिता लागण्यापूर्वी या आमदारांची निवड करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात महायुतीकडून विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या मतदारसंघांमध्ये दिलासा मिळाला आहे.
कोणाची नियुक्ती करण्यात आली…
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंगजी महाराज राठोड, शिवसेनेचे माजी खासदार हेमंतजी पाटील आणि माजी आमदार मनीषाताई कायंदे, तर राष्ट्रवादीचे पंकजजी भुजबळ आणि इद्रिसजी नायकवडी यांची आज राज्यपाल नियुक्त विधापरिषदेच्या आमदार पदी नियुक्ती करण्यात आली.



