पिंपरी : – भोसरी उड्डाण पुलावरून येणारी वाहतूक पिंपळे गुरवमध्ये थांबते, ज्यामुळे दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर लांब रांगा लागतात, ज्यामुळे कामकाजाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे आणि काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी खूप वेळ लागत असतो.
परिसरातील नागरिकांनी या समस्येवर लक्ष वेधत प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली आहे. सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे रस्ते खूपच वाहतूक समस्या तयार करत असतात. यामुळे कंपनीत आणि वेळेत ऑफिसमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे, असे एका नागरिकाने सांगितले.
वाहतूक व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास, पुढील काळात समस्या अधिक वाढू शकते. प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून नागरिकांचा मनस्ताप कमी होईल आणि सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था सुनिश्चित होईल.




