मुंबई : कोकणातील विधानसभा निवडणुकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ते बुधवारी कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहेत.
या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले असून, निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना गटाला कुडाळमध्ये मजबूत आधार मिळण्याची अपेक्षा आहे. निलेश राणे यांची राजकीय कारकीर्द आणि नारायण राणे यांचे नेतृत्व त्यांच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावेल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघातील राजकारणात नवीन वळण येणार आहे, हे निश्चित. निवडणूक प्रचाराच्या तयारीसाठी राणे कुटुंबाचे सर्व सदस्य सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या सर्व घटकांचा विचार करता, निलेश राणे यांचा निर्णय कोकणातील राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.



