मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठा राजकीय बदल घडला आहे. गटाचे नेते बापू भेगडे यांनी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत बंडाचा झेंडा फडकवला. त्यांनी हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर केला.
या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गदारोळ निर्माण झाला आहे. भेगडे यांच्या या पावलाने अन्य पदाधिकार्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि पुढील काळात आणखी किती पदाधिकारी राजीनामा देणार याकडे लक्ष लागले आहे. या राजीनाम्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे.
राजीनाम्याचे कारण, आगामी निवडणुकांसाठी इच्छित उमेदवारी मिळाली नाही व पक्षातील अंतर्गत संघर्ष असल्याचे मानले जाते. भेगडे यांच्या या पावलामुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवीन राजकीय समीकरण उभे राहण्याची शक्यता आहे. काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या वळणवर जाणार हे पाहावे लागणार.




