पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीही प्रतीक्षा आहे. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे तर चिंचवडमध्ये भाजपने शकर जगताप, आणि भोसरीत महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मतदारसंघात आणखी गडबड निर्माण होऊ शकते. इच्चुक उमेदवारांच्या संदर्भात काही खास चर्चा सुरु आहे, विशेषतः मनसेच्या संभाव्य उमेदवारांबाबत. अनेकांनी या लढाईत सामील होण्यासाठी मनसेच्या गाडीत बसण्याचे सूचवले आहे.
तिरंगी लढतीच्या दृष्टीने, प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची ताकद, मुद्देसुदी व मतदारांच्या भावनांचा विचार करून तिरंगी लढत रंगणार आहे. शहरातील राजकीय परिस्थिती पाहता, प्रत्येक पक्षाने आपल्या रणनीतीत बदल करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांमध्ये तिरंगी मुकाबला म्हणजेच महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात पुढील अपडेट्स मिळाल्यावरच अधिक स्पष्टता येईल, परंतु पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी कडून चिंचवड विधानसभेसाठी नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, चंद्रकांत नखाते, भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे, रवि लांडगे, विलास लांडे, सचिन चिखले, पिंपरी विधानसभेत जितेंद्र ननावरे, मयूर जाधव, सीमा सावळे, देवेंद्र तायडे, काळूराम पवार हे इच्चुक आहेत. यामधील काहीना उमेदवारी मिळणार नसल्याने निवडणूक लढवण्याचे निश्चित असणारे उमेदवार आयत्या वेळी मनसेच्या इंजिनात बसून मैदानात उतरणार अशी चर्चा सुरू झाली आहे.




