पिंपरी : चिंचवड विधानसभेत माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यांनी पिंपळे सौदागर ग्रामदैवत शंकर मंदिर ते थेरगाव येथील महापालिकेचे ‘ग प्रभाग’ पर्यंत पायी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
https://www.facebook.com/share/v/hhVRZzR32MJVYoP1/
थेरगाव येथील ग क्षत्रिय कार्यालय येथील निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज भरला. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत जगताप, विनोद नढे, संतोष कोकणे, श्याम जगताप, हरेश तापकीर, प्रशांत सकपाळ, शिरीष साठे, माजी नगरसेविका शीतल काटे, उषा काळे यांच्यासह निवडक पदाधिकारी समवेत अर्ज भरला.

पिंपळे सौदागर असे पायी रॅली काढत असताना नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. काटे यांचे ठिकठिकाणी जेसीपी मधून फुलांचा वर्षाव करून स्वागत करताना महिलांनी औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवकांचा प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला. आज चिंचवड विधानसभेतील अनेक इच्छुकांचे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठी गर्दी पहायला मिळाली.




