तळेगाव दाभाडे : सोसायट्यांनामधील रहिवास्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आजही प्रयत्नशील आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दिला.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी तळेगाव दाभाडेमधील सोसायट्यांना भेटी देत गाठीभेटीवर भर दिला. मतदारांनीही समाजात दुही माजवणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही, आमचं मत बापूसाहेब भेगडे यांनाच असा विश्वास दिला. रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी दिले.
मस्करनिस कॉलनी -2, लीलावती ग्रीन्स, जव्हेरी कॉलनी, लेक पॅराडाईज, कृष्णा आकार, शिक्षक सोसायटी, एंजल हिल्स, मोहर प्रतिमा, संस्कृती अपार्टमेंट, फ्लोरा सिटी, स्वराज नगरी, मावळ लँड, गंगा रेसिडेन्सी, लॅटिस सोसायटी आदी कॉलनींना भेट देत मतदारांना आवाहन केले. बापूसाहेब भेगडे म्हणाले, की मी तळेगाव नगरपरिषदेत असताना अनेक कॉलनींच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. आगामी काळातही सोसायटीतील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्यालाच मत देण्याचे आवाहन केले. तसेच मावळ विधानसभेचा आश्वासक आणि चौफेर विकास साधण्यावर बापूसाहेब भेगडे यांनी भाष्य केले.
यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल, असे आश्वासन दिले. पेढे भरवून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. सोसायटीधारकांनीही आपण ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहून निवडून आणू, असा शब्द दिला. मावळच्या पुढच्या ५० वर्षांचा विचार करून सुनियोजित विकासाचा आमचा संकल्प आहे. भूमीपुत्र म्हणून मला परिसराची संपूर्ण माहिती आहे. नगरसेवक म्हणून मी योग्य विकासकामे करून दाखवली आहेत. मावळ तालुक्याचा विकास करण्याचा माझा संकल्प आहे.
– बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा




