मावळ, दि. १६ नोव्हेंबर :- मावळ तालुक्याचा हाय व्होल्टेज निवडणूक सुरू आहे. बापू भेगडे यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्यांनी महिलांना सटवी बोलल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. दुसऱ्याच दिवशी नवा मामला समोर आला आहे. मावळ पॅटर्नची राज्यात चर्चा असताना आज चक्क महिलांना दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थक महिलांनी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचार करणाऱ्या महिलांना दिला चोप व शिवीगाळ केली. त्यामुळे मावळ विधानसभेत अपक्ष उमेदवार बापुसाहेब भेगडे यांची दहशत व दडपशाही सुरू असल्याचे पुन्हा दिसुन आले.
त्यामुळे मावळ विधानसभेत पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागेल हे भेंगडे समर्थकांना पचनी पडेना. दोन महिलांना मारहाण झाल्याने आमदार सुनिल शेळके समर्थक सर्व महिला तळेगाव पोलिस स्टेशनला दाखल झाल्या असुन तळेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोदंविण्याचे काम सुरु आहे.




