पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदारांना सहज सुलभ मतदान करता यावे, म्हणून जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील ८८ लाख ४९ हजार मतदार हे मतदानाचा हक्क बजाविणार असून, ८,४६२ मतदान केंद्र असणार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
पुणे शहरातील आठ, पिंपंरी चिंचवडमध्ये तीन आणि उर्वरित ग्रामीण भागात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघात ३०३ उमेदवार रिंगणात उभे आहे. त्यासाठी बुधवारी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असताना मतदानाच्या टक्केवारीत पुणे मागे असल्याबाबत निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली आहे.
दिव्यांग मतदारांचे घरबसल्या मतदान ९० टक्के झाले असले, तरी उर्वरित ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, सहाय्यक म्हणून ठेवण्यात येणार आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आवश्यकता असल्यास सरकते जीने आणि प्रत्येक केंद्रावर विशेष खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तीन हजार ७५० खुर्च्यांचे नियोजन करण्यात आले आहे,‘ असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर साधारणत: एक हजार मतदार याप्रमाणे ८,४६२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदानाला विलंब लागून नये, गर्दी होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. ६० गृहनिर्माण संस्थांमध्ये १२६ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर वैद्याकीय सुविधा मिळावी म्हणून प्रथमोपचार कक्ष, औषधे ठेवण्यात आली आहेत, तर २०० रुग्णालयांसोबत करार करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना किंवा मतदारांना तातडीने वैद्याकीय सुविोची आवस्यकता असल्यास वैद्याकीय विमा अंतर्गत ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले. तसेच सर्व मतदान केंद्रांवर विविध सुविधा देण्यात आल्या असून यावेळी मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा दावा डॉ. दिवसे यांनी केला.
● जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये ८,४६२ मतदान केंद्र
● २०७ मतदान केंद्रांतील ठिकाणांमध्ये बदल
● ४५ सहायकारी मतदान केंद्र
● तीन हजार ५०० वाहने असून त्यामध्ये १७२० बस ४२० कंटेनर, उर्वरीत जीप
● दीड हजार मतदान केंद्रांवर पाळणाघरे
● ९६ मतदान केद्र पदडानशिन असून या ठिकाणी तपासणीसाठी महिलांची नियुक्ती
● १९७० मार्गांवर बसची सुविधा
● २१ मतदारसंघात प्रत्येकी एक असे सखी मतदान केंद्र, युवक मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र
● ७५ लाखांपेक्षा जास्त मतदार चिठ्ठयांचे वाटप
● प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, मदत कक्ष, स्वच्छतागृह, वीज, दिव्यांगांसाठी सरकते जीने (रॅम्प) , वैद्याकीय सहायकाची नेमणूक
● मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांच्या नेमणुका
● दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था.
उमेदवारांची संख्या
मतदारांची संख्या
● Voter Heipline उपयोजन
● www. ceo. maharashtra. gov. in
● https:// electoralsearch. in
● दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी उपयोजन
● ‘व्होटर हेल्पलाइन -१९५०’ या क्रमांकावर एसएमएसची सुविधा
● १९५० टोल फ्री क्रमांक
‘गुगल मॅप’वर मतदान केंद्र पाहण्याची व्यवस्था
गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे गुगल टॅग करण्यात आली आहेत. गुगल मॅपमुळे मतदारांना मतदान केंद्र नेमके कुठे आहे, हे समजणार आहे.
मतदानासाठी यापैकी एक ओळखपत्र हवे
● मतदार ओळखपत्र
● पासपोर्ट (पारपत्र)
● वाहन चालक परवाना
● छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम,
● सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
● छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
● पॅनकार्ड
● राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) महसूल निर्मिती
● निर्देशांकद्वारे (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) दिलेले स्मार्टकार्ड
● मनरेगा जॉबकार्ड
● कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
● छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
● खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
● आधारकार्ड
वडगाव शेरी – ५,०३,५३९
शिवाजीनगर – २,९५,११७
कोथरुड – ४,४०,५५७
खडकवासला – ५,७६,५०५
पर्वती – ३,६०,९७४
हडपसर – ६,२५,६७५
पुणे कँटोन्मेंट – २,९५,३८२
कसबा पेठ – २,८३,६३५
एकूण — ३३,८१,३८४
ग्रामीण भागातील दहा मतदारसंघ
जुन्नर – ३,२५,७६४
आंबेगाव – ३,१४,२५२
खेड आळंदी – ३,७६,६२३
शिरुर – ४,६६,०४२
दौंड – ३,१९,३११
इंदापूर – ३,४१,४८५
बारामती – ३,८०,६०८
पुरंदर – ४,६४,०१७
भोर – ४,३०,२७८
मावळ- ३,८६,१७२
एकूण — ३४, १८,३८०
पिंपरी चिंचवडमधील मतदार संघ
चिंचवड – ६,६३,६२२
पिंपरी – ३,९१,६०७
भोसरी – ६,०८,४२५
एकूण — १६,६३,६५४
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरण नेहण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईइ तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. मतदान केंद्र अधिकारी आणि पोलीस यांना काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील डॉ. दिवसे यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत एकूण मतदान केंद्रांच्या संख्येपैकी ५० टक्के मतदन केंद्रांचे छायाचित्रिकरण करण्यात आले होते. मात्र मतदानासाठी लागणारा विलंब, गर्दी आणि मतदान सुरु असताना निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी याचे तातडीने निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने शहरी भागातील शंभर टक्के मतदान केंद्रांवर आणि ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचे छायाचित्रिकरण (वेबकास्टींग) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारयादीत नाव शोधून देण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येेते. मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून केंद्रापासून २०० मीटर दूरवर व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक टेबल, दोन खुर्च्या आणि दोन मदतनीस अशी मुभा देण्यात आली आहे. याठिकाणी राजकीय पक्षाचे चिन्ह, नाव किंवा मतदार चिठ्ठया वाटप करण्यास मज्जाव केला आहे.




