वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील आण्णा शेळके आणि सर्वपक्षीय उमेदवार अपक्ष बापू भेगडे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. यामध्ये “नेता विरुद्ध जनता” असा सामना पहावयास मिळाला तालुक्यातील सर्व नेते यांनी अपक्ष आमदार बापू भेगडे यांना निवडून आणण्यासाठी एकत्र आले होते. तर दुसरीकडे विकास कामाच्या जोरावरती आणि सामान्य जनतेशी संलग्न असणारे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासोबत जनता आणि विशेषता महिलांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्याचाच परिणाम आज सुनील आण्णा शेळके यांनी मिळणाऱ्या मतदानावर दिसून येत आहे.
अकरावी फेरी
सुनिल शेळके – 8175
बाप्पूसाहेब भेगडे – 2264
अकरावी फेरी अखेर
सुनिल शेळके यांना मिळालेली मते – 75449
बाप्पुसाहेब भेगडे यांना मिळालेली मते – 26758
सुनिल शेळके 48691 मतांनी आघाडीवर




