पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आजच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीचे शंकर जगताप यांनी विजय मिळवला आहे. त्यांना २ लाख ३५ हजार ३२३ मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना १ लाख ३१ हजार ४५८ मतं मिळाली. या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मोठा सहभाग होता. भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेक नगरसेवकांनी माघार घेत शंकर जगताप यांना पाठिंबा दिला.
याशिवाय पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे शंकर जगताप यांचा विजय निश्चित झाला, आणि त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ३ हजार ८६५ मतांनी विजय मिळवला आहे.
आज राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली. आज पर्यंत चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या सर्वाधिक मतांनी विजयाची नोंद झाली आहे.
यामध्ये विजयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सहभाग लक्षणीय होता. भाजपकडून इच्छुक असणारे अनेक नगरसेवकांनी माघार घेत शंकर जगताप यांना साथ दिली त्याचबरोबर पोट निवडणूक लक्षवेधी लढत देणारे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन शंकर जगताप यांना पाठिंबा दर्शवत महायुतीचा धर्म पाळला. यामुळे पहिल्यापासूनच निवडणुकीच्या विजयाकडे वाटचाल करणारे शंकर जगताप कितीचे मताधिक्य घेणार याची उत्सुकता होती. आज निकाल समोर आल्यानंतर शंकर जगताप यांना पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक लीड मिळाल्याचे दिसून आले.




