नाशिक : दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनिता चारोस्कर यांना मैदानात उतरवले होते. दिंडोरीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नरहरी झिरवाळ या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
नरहरी झिरवाळ- 1,38442
सुनीता चारोस्कर- 93910
सुशीला चारोस्कर- 9674
संतोष रेहरे- 4290
नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी
दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकी एक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठी राखीव आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट असूनही ते निवडून आले होते. नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केल्याने शरद पवारांकडून त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 24 हजार 520 मतं मिळाली होती. तर शिवसेनेने भास्कर गावित यांना तिकीट दिले होते. त्यांना 63 हजार 707 मतं मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून सुनिता चारोस्कर यांना संधी देण्यात आली होती



