पिंपरी चिंचवड, २१ डिसेंबर २०२४: मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात थंडीने धुके सर्वत्र पसरलेले होते. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे चेहेरे आणि त्यांची हालचाल जणू शोकात्मक वातावरण दर्शवत होती. शहरातील मुख्य रस्त्यांवर सिग्नलवर थांबलेली गाड्या आणि दुर्गा टेकडीवरचे थंड वातावरणात व दाट धुक्यात फिरायला आलेली माणसांचे दृश्य दिसत होते.
सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक, दुर्गा टेकडी उद्यान वरती चढत असलेल्या व्यक्ती आणि पायथ्याशी थंडीत चहा पिणारे लोक अशा विविध चित्रांनी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे कामावर निघालेल्या नागरिकांची झुंबड आणि पोटापाण्यासाठी डोक्यावर ओझे ठेवून चालणारे व्यक्ती थंड हवेमध्ये आणि दात धुक्यामध्ये आपला मार्ग शोधत होते.

सकाळची वातावरणाची ही दृश्ये, लोकांच्या चेहऱ्यावरील सर्दीची चाहूल आणि वाऱ्याची गती ही नेहमीपेक्षा वेगळी जाणवून देत होती. शहरातील रावेत, प्राधिकरण, चिखली, तळवडे, मोशी, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, कासारवाडी, दापोडी, चिंचवडगाव अशा विविध भागांमध्ये थंडीतून वाचण्यासाठी नागरिक विविध प्रकारांमध्ये दिसत आहेत.
सदर परिस्थिती लक्षात घेत, नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, या कडक थंडीत वाहनचालकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याची तसेच सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे.




