रावेत : मुकाई चौक, रावेत येथे सनी हासबे आणि अक्षय तरस यांच्या वतीने “स्व. बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे करण्यात आले, ज्यामुळे आयोजकांचे कौतुक करण्यात आले. आगामी काळात असेच आयोजन करून महाराष्ट्र तसेच देशासाठी उत्कृष्ट खेळाडू घडवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बोलताना केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील खेळाडूंनी आपली कौशल्ये आणि समर्पण दाखवले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाचे अभिनंदन करून त्यांनी स्पर्धेची यशस्विता आणि खेळाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
अशा स्पर्धा खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नवा उमेदीचा संचार होईल, अशी आशा नाना काटे यांनी बोलताना व्यक्त करण्यात आली.




