पिंपरी : “स्वप्न तुमचे, विश्वास आमचा” ह्या धर्तीवर काम करणाऱ्या एस बी ग्रुपच्या सिल्वर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘सिल्वर गार्डीनिया’ गृहप्रकल्पाला ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (बी ए आय) यांच्या माध्यमातून 2024 च्या बी ए आय शिर्के अवॉर्ड्स बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
आज, मला अत्यंत आनंद होतो आहे की जेव्हा आपले काम प्रामाणिकपणे, समर्पण आणि विश्वासाने केले जाते, तेव्हा त्याचे योग्य फळ मिळते. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘प्राइड वर्ल्ड’ने प्रथम, ‘न्याती ग्रुप’ने द्वितीय आणि ‘सिल्वर ग्रुप’ने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.
सिल्वर गार्डीनिया प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये उच्च दर्जाचा कामाचा प्रमाण, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची काळजी, तसेच कुटुंबांच्या आरोग्याचे सुनिश्चित करणारा प्रकल्प बनवण्यात आला. सुरक्षेच्या सर्व बाबींचे काटेकोर पालन केले गेले आणि त्या उत्तम दर्जाच्या प्रकल्पामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरला. विशेषत: पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात आहे, आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात आली आहे.
“मंजिले उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है… युहीं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है,” अशी एक प्रेरणादायी ओळ म्हणत सिल्वर ग्रुपचे अध्यक्ष, संतोष बारणे यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांचा विश्वास आहे की, एक मराठी आणि गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका मुलाने बांधकाम क्षेत्रात इतकी मोठी उंची गाठली, हे स्वप्न नाही तर सत्यता आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद, प्रामाणिकपणे केलेले काम, प्रत्येक ग्राहकाला दिलेला शब्द पाळणे, आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे आज हे यश मिळाले आहे.
हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबासह आणि माझ्या सर्व टीमला समर्पित करतो, ज्यात सर्व इंजिनियर्स, मार्केटिंग टीम, बांधकाम कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सिल्वर ग्रुप नेहमीच उत्कृष्टतेचा आदर्श ठेवत, आपल्या कार्यक्षेत्रात नागरिकांना नवनवी सेवा देत आहे असे सिल्वर ग्रुपचे अध्यक्ष संतोष बारणे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.




