चिखली : पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा करणारा पाईपलाईन वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. स्पाईन रोडवरील घरकुल चौकाजवळ महापालिकेचे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा वॉल लिकेज झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी चिंचवडकर नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्य होताना दिसतो. पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कोट्यावधीचे ठेकेदारांची नेमणूक केली आहे तर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचेही दिसून येत आहे.




