पिंपरी : मुकाई चौकातून वाकडला जाणारा मेट्रो मार्ग वाकड ऐवजी मुकाई चौकातून पुनावळे, कोलते पाटील गृह प्रकल्प, जांबे, मारुंजी, हिंजवडी फेस टू पर्यंत मार्ग नियोजित करण्यात यावा. या मेट्रोचा भक्ती शक्ती पासून पुढे मेट्रो मार्ग स्पाईन रोड लगत त्रिवेणीनगर, घरकुल चौक, जाधववाडी, जय गणेश साम्राज्य ते चऱ्होली, आळंदी पर्यंत मेट्रो मार्ग करावा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दळणवळण अधिक जलद होईल. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक करताना दिसत आहेत.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग वाकड लगत गेलेला आहे. भविष्यात नाशिक फाट्यावरून पिंपळे सौदागर, जगताप डेयरी ते वाकड असा मेट्रोचा मार्ग वाढवता येईल. आणि पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण भाग मेट्रोला जोडण्यासाठी नव्याने प्रस्तावित मेट्रो मार्गाचा पुनर्विचार मेट्रो प्रशासन, महापालिका व राज्य सरकार यांच्या वतीने केला पाहिजे.
अजितदादाच्या दूरदृष्टीतून मेट्रो मार्ग बनवा…
विकास करताना पुढील 20 वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री व विकासाचे दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. दादांना पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण परिसराची आणि उपनगरांची सखोल माहिती आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करताना शहराचे नाव देशपातळीवर नेणारे अजितदादा नव्याने विकसित होणाऱ्या मेट्रोमार्गाचा पुनर्विचार करतील. असा सूर सामान्य पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमधून होत आहे.
शरद नवीन दोन मेट्रो मार्ग, भक्ती शक्ती रावेत ते वाकड आणि नाशिक फाटा ते चाकण
काय म्हणाले श्रावण हर्डीकर
रावेत येथील मुक्ताई चौक ते वाकड आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महा-मेट्रोने सुरू केले आहे. येत्या काही दिवसांनी या मार्गाचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर हा डीपीआर मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. याला मंजुरी मिळाली की त्यानंतर या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे एमडी श्रावण हर्डीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.




