पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात बिबट्याचा वावर अजूनही कायम असल्याचा एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. काही महिन्यापूर्वी चिखली पाटील नगर येथे बंगल्यात बिबट्या घुसला होता. तर आज प्राधिकरणातील सेक्टर 24 मधील संत कबीर उद्यानात एक बिबटे असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी तातडीने महापालिकेला कळवून अग्निशामक दल आणि पोलीस सुरक्षा विभागाच्या मदतीने बिबट्यांना जेरबंद करण्याचे कार्य सुरू केले आहे. बिबट्याला जेर बंद करण्याचे काम सुरू असताना नागरिकांनी कॅमेरात घटना कैद करण्यासाठी जीवघेणी धडपड करताना दिसत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार यंत्रणेकडून एका बिबट्या जेरबंद केले आहेत.
https://www.instagram.com/reel/DFj0rBtoZTd-3UCjEtAAVCoi8St6EfbSeoj1hU0/?igsh=MW0wYjd3MjVzcjR5ZQ==
संत कबीर उद्यानात बिबट्यांचा वावर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, महापालिकेच्या वतीने शंभर टक्के सुरक्षेची व्यवस्था केली जात आहे. स्थानिक प्रशासन व नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही अप्रिय घटना घडू न देण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. वातावरण शांत करण्यासाठी प्रशासनाने बिबट्यांना त्वरित जेरबंद करण्याचे काम सुरू केले असून, परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना घेतल्या आहेत.





