चिखली : चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाई होणार असल्याचे महापालिकेचे अधिकारी यांनी सांगितले. मागील तीन दिवसांपूर्वी या भागात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने तात्पुरती स्थगिती देत कारवाई थांबवली होती, परंतु आता ७ दिवसांनी पुन्हा या भागात कारवाई होणार असल्याचे सूचित केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर असलेल्या परिणामांमुळे आणि परिसरात घडलेल्या अनेक आगीच्या घटनांमुळे प्रशासनाने ही कारवाई आणखी महत्त्वाची ठरवली आहे. स्थानिकांना असलेल्या चिंता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारवाईची आवश्यकता असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, यापुढेही या भागातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जाईल, नागरिकांनी अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घ्यावीत व महापालिकेच्या परवानगीने अधिकृत घरे बांधावी. जेणेकरून नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित केली जाऊ शकते असे मनोज लोणकर यांनी म्हटले आहे.




