पिंपरी चिंचवड, (जनशक्ती न्यूज) 5 फेब्रुवारी 2025:
नवी सांगवी परिसरातील रस्त्याच्या कडेला बायो मेडिकल कचरा उघड्यावर फेकला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. या कचऱ्यामुळे परिसरातील स्वच्छतेवर गंभीर परिणाम होत असून, पर्यावरणीय धोक्याचा इशारा देत आहे.
कचऱ्यात असलेल्या मेडिकल वेस्टमुळे जंतू व विविध रोगांचे प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात लहान मोठे हजारो दवाखाने आहेत. यामध्ये अनेक दवाखाने विना परवाने आहेत. अशा हॉस्पिटल कडून बायोमेडिकल कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याचे दिसून येते.
नागरिकांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्हाला सुरक्षा आणि स्वच्छतेची चिंता आहे. जर हे असेच चालले तर आरोग्याच्या दृष्टीने ते धोकादायक ठरेल असे मागणी स्थानिक रहिवाशाने प्रशासनाकडे केली आहे. पालिकेने या गंभीर समस्येवर त्वरीत लक्ष द्यावे आणि योग्य उपाययोजना करण्याची मागणी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून होत आहे.




