पिंपरी ; पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील बावधन पोलीस स्टेशनमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका वयस्कर महिलेला तिच्या घरात मारहाण करत एका महिलेने दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक संस्थेत काम करण्याचं बनाव करुन एका मुलीने एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ नागरिक महिलेने चोरी करणाऱ्या महिलेला प्रतिकार केल्यानंतर चोरी करणाऱ्या महिलेने ज्येष्ठ नागरिक महिलेला आपल्या ओढणीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, ज्येष्ठ नागरिक महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या घराजवळून जाणाऱ्या दोन तरुणांनी तिच्या घराच दार तोडून चोरी करणाऱ्या महिलेच्या तावडीतून ज्येष्ठ नागरिक महिलेची सुटका केली आहे. त्याचे सर्व चित्रीकरण करण्यात आले आहे.




