
पुणे : पुणे शहरातील वाहतूकीचे नियोजन करुन संभाव्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच नागरिकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी शहरातील रस्त्यांवर डंपर, मिक्सर, हायवा, स्लो मोव्हिंग (जे सी बी रोड, रोलर, टॅक्टर) वाहनांमुळे होणार्या अपघाताचे व वाहतुक कोंडीचे प्रमाण कमी करण्यासाठी सकाळीच्या व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
वाहनांचा प्रकार प्रवेश बंद मुथा/शिथिल
डंपर, हायवा व स्लो सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार
मुव्हिंग (जे सी बी, रोड सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत दुपारी १२ ते सायं़ १६पर्यंत
रोलर, टॅक्टर इ़) सायं़ १६ ते रात्री २२ पर्यंत (रेड झोन वगळुन इतर (अंतर्गत वाहतूकदेखील बंद रस्त्यावर) तसेच
राहिल) रात्री २२ ते सकाळी७पर्यंत
………………………………………………………………………….
मिक्सर सोमवार ते शनिवार सोमवार ते शनिवार
सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत सकाळी ११ ते सायं. १७ पर्यंत
…………………………………………………………………………
पीएससी, मेट्रो सोमवार ते शुक्रवार शनिवार व रविवारी
व इतर शासकीय सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत वाहतूकीस पूर्ण वेळ परवानगी राहिल. परंतु
कामासाठी सायं. १७ ते रात्री २२ पर्यंत १७ ते २२ वा़ पर्यंत वाहतूक बंद राहिल़
(अंतर्गत वाहतुक देखील बंद राहील) (वाहतूकी करीता ७२ तासांपूर्वी परवानगी अर्ज इकडील
कार्यालयास सादर करावा)
……………………………………………………………………………………….
डंपर, हायवा, मिक्सर, स्लो रविवारी
मुव्हिंग (जे सी बी, रोड वाहतूकीस पूर्ण वेळ परवानगी राहिल, परंतु १७ ते २२ वा़ पर्यंत वाहतूक बंद
रोलर, टॅक्टर इ़ं )
………………………………..
रेड झोन (शहरातची मध्यवर्ती ठिकाणे /रस्ते)
(खालील चौक/जंक्शनपासून पुढे अंतर्गत भागात प्रवेश बंद राहिल)
नगर रोड : १)विमाननगर चौकातून दत्त मंदिर चौकाकडे प्रवेश बंद
२) शास्त्रीनगर चौकातून कल्याणीनगरकडे प्रवेश बंद
३) पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क जंक्शनकडे प्रवेश बंद
४) वडगाव शेरी येथून बिशप स्कुल कल्याणीनगरकडे प्रवेश बंद
५) पेट्रोल साठा चौकातून पुढे ऐअरपोर्टकडे प्रवेश बंद
६) लोहगाव पासून पुढे पेट्रोल साठा चौकाकडे प्रवेश बंद
जुना पुणे मुंबई महामार्ग :
७) पाटील इस्टेटचे पुढे इंजिनिअरींग कॉलेज चौकाकडे प्रवेश बंद
गणेशखिंड रोड :
८) ब्रेमन चौकाचे पुढे विद्यापीठ चौकाकडे प्रवेश बंद
९) ब्रेमन चौकाचे पुढे औंध परिहार चौकाकडे प्रवेश बंद
१०) औंध – वाकडे रोडवरुन महादजी शिंदे ब्रीजचे पुढे प्रवेश बंद
बाणेर रोड : ११) राधा चौकाचे पुढे बाणेरकडे प्रवेश बंद
पाषाण सुस रोड :
१२) पाषाण शिवाजी पुतळ्याकडे पुढे अभिमान श्री चौकाकडे प्रवेश बंद
पौड रोड : १३) पौड रोडवरुलन पौंड जक्शनचे पुढे नळस्टॉपकडे प्रवेश बंद
१४) पौड रोडवरुन एसएनडीटी/ लॉ कॉलेज रोडकडे प्रवेश बंद
कर्वे रोड,डी पी रोड :
१५) कर्वे पुतळ्याचे पुढे पौंड फाट्याकडे प्रवेश बंद
सिंहगड रोड : १६) राजाराम पुलाचे पुढे स्वारगेटकडे प्रवेश बंद
१७) राजाराम पुलाचे पुढे कर्वेनगर/ डी पी रोड कडे प्रवेश बंद
सातारा रोड : १८) मार्केट यार्ड जक्शनचे पुढे स्वारगेटकडे प्रवेश बंद
१९) दांडेकर पुलाचे पुढे सेनादत्त चौकीचे पुढे प्रवेश बंद
२०) मित्र मंडळ चौकाचे पुढे सारसबागकडे प्रवेश बंद
सोलापूर रोड : २१) सेव्हन लव्हज चौकातून पुढे टिंबर मार्केटकडे प्रवेश बंद
२२) सेव्हन लव्हज चौकातून पुढे स्वारगेटकडे प्रवेश बंद
२३) गोळीबार मैदान जक्शन कडून लष्कर/खान्यामारुतीकडे प्रवेश बंद
२४) मंम्मादेवी जक्शनकडून लष्कर/ कॅम्पकडे प्रवेश बंद
२५) भैरोबानाला जक्शंनकडून इम्प्रेस गार्डनकडे प्रवेश बंद
२६) भैरोबानाला जक्शंनकउून रेसकोर्स कडे प्रवेश बंद
२७) रामटेकडी चौकाकउून बी टी कवडे रोडकडे वाहतूक कोंडी
२८) मगरपट्टा कडून ताडीगुत्ता चौक/ पासपोर्ट आॅफिसकडे वाहतूक कोंडी
२९) मुंढवा जक्शंन कडून ताडीगुत्ता चौकाकडे प्रवेश बंद
कोंढवा : ३०) एनआयबीएम रोडने ज्योती हॉटेल चौकाचे पुढे/ वानवडीकडे प्रवेश बंद
३१) लुल्लानगर चौकातून वानवडीकडे प्रवेश बंद




