पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांना राज्याचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सज्जड दम दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत तसेच महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ६) जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा त्याचप्रमाणे इतर मान्यवरांचा सत्कार सुरू असताना उपस्थितांकडून शिट्ट्या वाजविण्यात येत होत्या. त्याचवेळी अजितदादा पवार यांनी माईक हातात घेत हा पोलिसांचा कार्यक्रम आहे, शिट्ट्या कसल्या वाजवता.. शिट्ट्या वाजवल्या तर पोलिसांना उचलायला लावेल असा दिला सज्जड दम दिला.



