
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी शहरप्रमुख, माजी नगरसेवक सचिन भोसले यांच्या जागी वाघेरे यांची नियुक्ती केली आहे.
संजोग वाघेरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्याकडे मावळच्या संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. या पक्षाकडून त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभवाची धूळ चारली होती. आता ते शहर शिवसेनेच नेतृत्व करणार आहेत.




