चिंचवड : पूर्णानगर चिंचवड येथील एचपी पेट्रोल पंपावर आज एक मोठा गोंधळ उडाला. पंपावर दूषित पेट्रोल देण्यात आले होते, ज्यामुळे अनेक टू व्हीलर बंद पडले. वाहनधारकांच्या संतापामुळे तेथील स्थिती तणावपूर्ण बनली. जवळपास 20 ते 25 टू व्हीलर बंद पडल्याने वाहन चालकांनी पंपावर गर्दी केली.

या घटनेची माहिती समजताच जवळ असणाऱ्या चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पंप प्रशासनाने योग्य तपासणी करत आहे. पेट्रोलऐवजी पाणी मिळाल्याने अनेक दुचाकी अचानक बंद पडलेल्या आहेत. या घटनेमुळे पंपावरील ग्राहकांना मोठा नोकसानाचा सामना करावा लागला.
सध्या पंप प्रशासनाने माफी मागितली असून तपास सुरू आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना भोसले पेट्रोल पंपा वरती घडलेल्या आहेत असे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून भोसले पेट्रोल पंपा वरती व त्यांच्या मालकावरती कडक कारवाई करावी आणि गाडी मालकांची झालेले संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी यावेळी केली आहे.



