
हिंजवडी: माण – चांदे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी माण चे माजी ग्रामपंचायत सदस्य बापू भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वि द माळवदकर यांनी अध्यासी अधिकारी म्हणून तर आण्णासाहेब भालेकर यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
मुळशीचे सहाय्यक निबंधक यांचे पौड येथील कार्यालयात सोसायटी च्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. भोसले यांच्या निवडीची घोषणा होताच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे व मुळशी चे माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन जयवंत राक्षे,मावळते चेअरमन अर्जुन पारखी, दत्तात्रय पारखी,प्रेरणा बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश पारखी, विलास गवारे,राजाराम पारखी, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,योगेश वाघूलकर,सुरेखा पारखी, सुमन पारखी, शिवाजी भिलारे, जीवन पारखी, पोपट पारखी, दशरथ पारखी, आनंद पारखी , सतिश भोसले, परमेश्वर भरणे यांच्यासह संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूसाहेब भोसले हे मा




