
पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे गाव, बालेवाडी येथील वाहतुकीत शनिवारी (दि. 22) दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत शनिवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हे बालेवाडी येथे होणार्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तसेच दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. कार्यकमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे आणि बालेवाडी परिसरातील वाहतुकीमध्ये बदल केले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असे आहेत बदल…
हिंजवडी वाहतूक विभाग चांदे-नांदे-म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग
- चांदे-नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माणमार्गे हिंजवडीमार्गे इच्छित स्थळी जातील.
- बालेवाडी जकात नाका व बाणेर हद्दीतून येणारी जड-अवजड वाहने ही राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाकामार्गे हिंजवडीमार्गे इच्छित स्थळी जातील.
- सुस ब्रिजकडून राष्ट्रीय महामार्गावरुन न्याती शोरूम समोरील पंक्चर येथून राधा चौकाकडे येणारी जड अवजड वाहने ही बंगळूर-मुंबई हायवेने वाकड नाकामार्गे हिंजवडीमार्गे इच्छित स्थळी जातील.
- बालेवाडी स्टेडियम म्हाळुंगेकडील मेनगेट समोरील रस्ता हा शितळाई देवी चौक (पुणेरी स्वीट) ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
- चांदे- नांदे व म्हाळुंगे गावातून राधा चौकाकडे जाणारी वाहने ही शितळाईदेवी चौक (पुणेरी स्वीट) येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
- राधा चौकातून म्हाळुंगे गावाकडे जाणारी वाहने ही म्हाळुंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.
- राधा चौक ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सर्व्हिस रोडवर (कार्यक्रमास येणारी वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने सातारा-मुंबई महामार्गाच्या मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.




