पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
या गैरप्रकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी तपासाची मागणी करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एका विद्यार्थिनीने या प्रकाराबाबत वारंवार तक्रार केली असतानाही महिला वसतिगृह अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर, संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरूंना पत्र लिहून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली, ज्यामुळे हा गंभीर मुद्दा आता प्रकाशझोतात आला आहे.