हिंजवडी :आज सकाळी ११ वाजता मुळशी तालुक्यातील पडळघरवाडी, रीहे येथे नदीतील गाळ काढण्याचे महत्त्वाचे कार्य सुरू करण्यात आले. या उपक्रमाला नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत आणि सर्व गावकऱ्यांनी या कामासाठी एकत्र येऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष श्री. सुनीलभाऊ चांदेरे, माजी उपसभापती सौ. सारीकाताई शंकरभाऊ मांडेकर, रोकेश्वर सोसायटीचे चेअरमन रामचंद्रमामा देवकर, नाम फाऊंडेशनचे श्री. जावळकर, तसेच ग्रामपंचायतीचे प्रमुख, सरपंच आणि उपसरपंच, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. सरपंच बाबाजी शेळके, सरपंच सौ. ज्योतीताई अविनाश खेंगरे, उपसरपंच सौ. रंजनाताई सागर शिंदे, तसेच अन्य प्रमुख उपस्थित होते. याशिवाय, मा. सरपंच विलासराव केमसे, नामदेव तावरे, भुषण बोडके, मेहुल पडळघरे, माऊली पडळघरे, प्रविण पडळघरे, नवनाथ ओझरकर, सोसायटी सचिव निलेश शिंदे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
ग्रामपंचायतीने या उपक्रमाला शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व दिले आहे, ज्यामुळे या भागातील पर्यावरण सुधारण्यात मदत होईल, तसेच नदीतील गाळ काढल्याने जलसाठ्यात वाढ होईल आणि याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होईल, असे सरपंच श्री. अनिल मोरे यांनी सांगितले. हा उपक्रम केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही तर, ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामीण भागात विकासाच्या दिशा निश्चित करणाराठरू शकतो.




