पुणे : साहिल बबन डोंगरे (वय-25, धंदा- वकिली) याचे दिनांक 17/3/2025 रोजी रात्रीं 00/40 वाजता हडपसर पोलिस स्टेशन येथून अपहरण करून त्यास काळया रंगाच्या गाडीत घेऊन जाऊन 20 ते 22 लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिले बाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती.
सदर बातमीच्या अनुषंगाने लागलीच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला त्यानुसार CCTV फूटेज तपासले असता इसम नामे साहिल डोंगरे हा रात्री सागर बार गाडीतळ येथे रात्री 10/00 वा च्या सुमारास त्याचा मित्र अनिकेत मस्के सोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत आहे.
अनिकेत मस्के हा बार मधून घरी गेल्याचे सांगत आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेले तांत्रिक विश्लेषण याचे आधारे साहिल डोंगरे हा दिनांक 17.03.2025 रात्री 11.30 वाजताची सुमारास व 18/03/2025 पहाटे 05.00 दिवे घाट / दुमेवाडी येथे असल्याचे दिसून आले. डायल 108/112 वर कॉल झाल्याचे व सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले. त्यांचे कडे अधिकची चौकशी केली असता डायल 112 वर अपघाताचा कॉल असल्याचे समजले त्यानंतर आम्ही सासवड पो स्टे येथील अंमलदार यांची चौकशी केली त्यांनी आम्हाला सांगितले की रात्री 11.30 च्या दरम्यान हॉटेल साईरूप जवळ 1 बाईक वाल्याचा अपघात झाला आहे व त्याचा डोळ्याला लागले आहे व बेशुद्ध आहे व मदत हवी आहे असा कॉल प्राप्त झाला होता परंतु ते आगीच्या कॉल ला आल्यामुळे सदर कॉल ला जाऊ शकले नाही. त्यांना प्राप्त एमडीटी कॉल ची माहिती घेऊन त्यावरील कॉलर यांना संपर्क केला असता कॉलर याने सांगितले की त्याचे समोर बाईक स्वारचा अपघात झाला व तो स्वतः मोटार सायकल वर पडून जखमी होऊन त्याचे डोळ्याला दुखापत झाले असल्यामुळे कॉल केला होता असे सांगितले व मी तेथून निघून गेल्याचे सांगितले.
त्यानंतर सासवड येथील अॅम्ब्युलन्स वरील डॉक्टर यांचे कडे चौकशी केली असता त्यांना पण सदर कॉल प्राप्त होता. ते सदर ठिकाणी 1200 सुमारास जाऊन आले परंतु त्यांना सदर अपघातातील जखमी इसम कुठेही मिळून आला नाही.
त्यानंतर 18/03/2025 रोजी डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर स्वतः कॉल करून सांगितले त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल 108 अॅम्ब्युलन्स आली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारा का मी घेऊन गेले.