
पिंपरी, २५ मार्च २०२५: महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज, २५ मार्च २०२५ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. या महत्वपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी एकमुखीपणे अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार ठरविण्याचे संकेत दिले.
महायुतीचे नेते आणि संख्याबळ पाहता उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी २६ मार्च २०२५ रोजी निवडणूक होणार आहे.
