पिंपरी : निळ्या पूररेषेतील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाकरिता वाढीव टीडीआरला मान्यता देण्याकरिता संयुक्त समिती नेमणार अशी नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या आदेशाने मंत्री ना. उदयजी सामंत यांनी विधानसभेत घोषणा केली. मुंबई येथील अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरातील ब्लू लाईन व रेड लाईन संदर्भात लक्षवेधी मांडली होती. शंकर जगताप यांनी ब्ल्यू लाईन मधील दिलेल्या परवानगी रद्द करणार का? तसेच नव्याने परवानगी मागितलेली आहेत त्यांना परवानगी देणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता.
https://www.instagram.com/reel/DHnvMVbtGTy/?igsh=MXNiOHRyY3RwcWR2MA==
मंत्री सामंत यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवडसह राज्यातील नदीलगत भागातील ज्या ठिकाणी ब्लू लाईन व रेड लाईन अस्तित्वात आहे, त्या सर्व क्षेत्रांचा पुनर् सर्वे केला जाईल. यामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, नदीलगतच्या क्षेत्रांचा विकास आणि पुनर्विकास यासाठी योग्य दिशा होईल. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे करून ब्ल्यू लाईन तयार केलेली आहे. इरिगेशन डिपार्टमेंटची एक समिती याचा नव्याने अहवाल तयार केला जाईल. त्यावरून सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला जाईल. तसेच काहीना नियम बाह्य परवानगी दिलेली असेल तर ती रद्द केली जाईल. तसेच त्यावर कारवाई केली जाईल असे सामंत यांनी म्हटले आहे.
पुनर् सर्वे केल्याने संबंधित क्षेत्रांमध्ये कायदेशीर आणि पर्यावरणीय अडचणी दूर होऊन नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. तसेच काही बांधकाम व्यवसायिकांनी अन अधिकृतपणे परवानगी मिळवून बांधकामे केले आहेत त्या बांधकामाच्या परवानगी आहे रद्द करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.




