: रस्त्यावर नमाज पढण्याचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते असा दावा केला जातो. याच पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्च रोजी ईदच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील मीरत पोलिसांनी इशारा दिला आहे. रस्त्यावर नमाज पढल्यास थेट पासपोर्ट रद्द होण्याची कारवाई होऊ शकते, असं मीरत पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कारवाईवर केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय लोकदलचे प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी सूचक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहेत मीरत पोलिसांचे आदेश?

मीरत पोलिसांनी ईदच्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढले आहेत. मुस्लीम समाजाने या काळात रस्त्यावर नमाज पढण्यासाठी बसू नये, असं आवाहन मीरत पोलिसांकडून करण्यात आलं आहे. ईदच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश न पाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणे, पासपोर्ट व वाहन परवाने रद्द होणे अशी कारवाई होऊ शकते, असा इशाराच मीरत पोलिसांनी दिला आहे.