वाकड : पुनावळे येथे अधिरा इंटरनॅशनल स्कूल आणि इसको इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते मा. श्री. मुरलीकांत पेटकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ही स्पर्धा विशेषत: वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरातील विविध हौसींग सोसायट्यांमधील खेळाडूंना कराटे खेळात आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी ठरली. एकूण ५०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्पर्धेला विशेष रंगत आणली.
विजेत्या स्पर्धकांना अधिरा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री. नवनाथ ढवळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील युवा पिढीमध्ये क्रीडा संस्कृती बळकट होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास ढवळे यांनी व्यक्त केला.




